व्हिसा नसताना दिली परदेशी महिलांना नोकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हिसा नसताना दिली परदेशी महिलांना नोकरी
व्हिसा नसताना दिली परदेशी महिलांना नोकरी

व्हिसा नसताना दिली परदेशी महिलांना नोकरी

sakal_logo
By

पुणे : परदेशी महिलांना मसाज सेंटरमध्ये नोकरीस ठेवून व्हिसा कागदपत्रांची पूर्तता न केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाकडून (एफआरओ) मसाज सेंटरचा मालक, व्यवस्थापकासह जागा मालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
कोंढव्यातील एका मसाज सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार एफआरओच्या पथकाने उघडकीस आणला होता. त्या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या कारवाईत पोलिसांनी चार परदेशी महिलांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्या चार महिला मूळच्या थायलंडच्या असून त्या नोकरी करण्याचा व्हिसा नसताना मसाज सेंटरमध्ये काम करत असल्याचे चौकशीत उघडकीस आले होते. ताब्यात घेण्यात आलेल्या चार महिलांना मुंढव्यातील शासकीय महिला सुधारगृहात ठेवण्यात आले असून त्यांची रवानगी लवकरच त्यांच्या माय देशात करण्यात येणार आहे.