पोस्टाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोस्टाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पोस्टाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पोस्टाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

sakal_logo
By

पुणे : पोस्ट खात्यात जमा केलेल्या रकमेचा अपहार केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आहे. पोस्टाच्या कुरिअर सेवेपोटी ग्राहकांनी जमा केलेल्या साडेतीन लाख रुपयांचा अपहार झाला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी येरवडा पोस्ट कार्यालयातील डाक सहायकच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भगवान श्रीरंग नाईक (वय ३७) असे गुन्हा दाखल केलेल्या डाक सहायकाचे नाव आहे. याबाबत पोस्टातील अधिकारी योगेश नानासाहेब वीर (वय ४२) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईक येरवड्यातील पोस्ट कार्यालयात डाक सहायक आहेत. टपाल खात्याच्या कुरिअर सेवेसाठी ग्राहकांनी जमा केलेली तीन लाख ५९ हजार २९४ रुपये नाईक यांनी जमा केले नाही. या रक्कमेचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले. त्यानंतर त्यांच्या विरुद्ध शासन आणि ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक काटे तपास करत आहेत.