तबला वादनातून पं. भाई गायतोंडे यांना मानवंदना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तबला वादनातून पं. भाई गायतोंडे यांना मानवंदना
तबला वादनातून पं. भाई गायतोंडे यांना मानवंदना

तबला वादनातून पं. भाई गायतोंडे यांना मानवंदना

sakal_logo
By

तबलावादनातून पं. भाई गायतोंडे यांना मानवंदना
पुणे, ता. ८ ः तबलावादक पं. भाई गायतोंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या शिष्या संजीवनी हसबनीस यांनी संगीत सभेचे आयोजन केले होते. या वेळी तबलावादनातून पं. गायतोंडे यांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीपाद पारखे यांनी तबल्यावर तीनताल प्रस्तुत केला. त्यांना संवादिनीवर संकेत सुवर्णपाठकी यांनी साथसंगत केली. त्यानंतर पं. सुप्रीत देशपांडे यांनी तबलावादन केले. श्रीराम हसबनीस यांनी त्यांना संवादिनीवर साथ दिली. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.

समवेदना संस्थेचा रविवारी स्नेहमेळावा
पुणे, ता. ८ ः समवेदना संस्थेतर्फे विसाव्या वर्धापनदिनानिमित्त येत्या रविवारी (ता. ११) स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मॉडेल कॉलनी येथील भारतीय विद्या भवनच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता हा मेळावा होणार आहे. या वेळी ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे ‘माझ्या कर्करोगाविरुद्धच्या लढ्याची कहाणी’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. समवेदना ही संस्था आरोग्य क्षेत्रात गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेतर्फे गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत, वस्तीपातळीवरील महिलांसाठी कर्करोग पूर्वनिदान तपासणी शिबिर, ग्रामीण स्त्रियांच्या आरोग्य तपासणीसाठी शिबिर, मुळशी, भोर व वेल्हे तालुक्यातील ४६ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘शालेय आरोग्य उपक्रम’, मुळशी भागात ‘फिरता दवाखाना’ असे विविध उपक्रम राबवले जातात.