
व्यावसायिक इन्स्टंट पीठे व इन्स्टंट फूड
पुणे, ता. ८ : सध्याच्या धावपळीच्या युगात इन्स्टंट फूडला बाजारपेठेमध्ये खूप मागणी आहे. हे लक्षात घेऊन इन्स्टंट पीठे व इन्स्टंट फूड तयार करण्यास शिकवणारी एक दिवसीय प्रात्यक्षिकावर आधारित कार्यशाळा रविवारी (ता. ११) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजिली आहे. यामध्ये इडली पीठ, दोसा पीठ, उडीद वडा, गुलाब जामून मिक्स, आइस्क्रीम मिक्स, इन्स्टंट फालुदा, नाचणी डोसा, नाचणी इडली, पकोडा मिक्स, रबडी मिक्स, ढोकळा मिक्स, इडली चटणी मिक्स, गोबी मंचुरियन मिक्स, तंदूर मिक्स हे पदार्थ कृतीसह शिकवले जातील. या उत्पादनांना बाजारपेठेत असलेल्या संधी, प्रॉडक्ट मार्केटिंग, कॉस्टिंग, पॅकिंग, लेबलिंग, मशिनरी इ.विषयी तज्ज्ञ गंधाली दिंडे मार्गदर्शन करतील. नोट्सही व डिजिटल प्रमाणपत्रासह प्रतिव्यक्ती शुल्क १७५० रुपये.
परसबागेला बनवा न्यूट्रिशनल किचन गार्डन
किचन गार्डन प्रकारात टेरेस, बाल्कनी, उभ्या भिंती, घराच्या आतील रिकाम्या जागेत भाजीपाला घेणे शक्य आहे. किचन गार्डन हे फक्त भाजीपाला पुरवणारे गार्डन नसून आपल्या आरोग्याला सांभाळणारे न्यूट्रिशनल गार्डन बनू शकते. याद्वारे भाजीपाला, सक्युलंन्ट्स व कॅक्टस, फॉलिएज व फुलझाडे उत्पादन ते हायड्रोपोनिक अर्थात माती विरहित पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या भाजीपाला उत्पादनाचे मार्गदर्शन करणारे प्रमाणपत्र प्रशिक्षण शनिवार (ता. १०) व रविवारी (ता. ११) आयोजिले आहे. टेरेस गार्डन, बाल्कनी गार्डन, इनडोअर भाजीपाला गार्डन, आउटडोअर भाजीपाला गार्डन, जनरल किचन गार्डन इ. प्रकार, टेरेस वा घराजवळील जागेत भाजीपाल्याशिवाय हंगामी कोणकोणती फुलझाडे व शोभेची झाडे आपण लागवड करू शकतो, त्यासाठीचे नियोजन, माती व कुंड्या भरण्याची पद्धती तसेच अन्नद्रव्य आणि रोग-कीड नियंत्रण, हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स, एक्वापोनिक्स इ.विषयी मार्गदर्शन होईल. प्रशिक्षणार्थींना व्हेजिटेबल स्टार्टर सीड कीट दिली जाणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ४००० रुपये. आगाऊ नावनोंदणी केल्यास १००० रुपये सवलत मिळेल.
ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र.१, बाणेर रस्ता, औंध, पुणे.
नोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१, ८९५६३४४४७२