रिअल इस्टेट एजंटसाठी उद्यापासून प्रशिक्षण

रिअल इस्टेट एजंटसाठी उद्यापासून प्रशिक्षण

पुणे, ता. ८ : महारेरा नोंदणीकृत रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी महारेराने बंधनकारक केलेले प्रमाणपत्र आता एजंटना सोबत बाळगावे लागणार आहे. महारेराने याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत (महारेरा आदेश क्र. ४१/२०२३). प्रमाणपत्र नसणाऱ्या एजंटना महारेराच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नोंदणीकृत एजंटमार्फतच मालमत्ता खरेदी करावी असे आवाहनही महारेराने ग्राहकांना केले आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रशिक्षण पूर्ण करणे तसेच एप्रिल व मे महिन्यात महारेरातर्फे होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
‘सकाळ माध्यम समूहा’ची शैक्षणिक संस्था असणाऱ्या ‘एसआयआयएलसी’ला या प्रशिक्षणासाठी महारेराकडून अधिकृत प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. संस्थेतर्फे २० तासांचे ऑनलाइन तसेच ३तीन दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण घेतले जाते.
ऑनलाइन प्रशिक्षणाची पुढील बॅच १० एप्रिलपासून सुरू होत आहे. सकाळी ८ ते १० आणि सांयकाळी ७ ते ९ या वेळेत हे प्रशिक्षण होईल. तसेच ऑफलाइन प्रशिक्षण १०, ११ व १२ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सकाळनगर, बाणेर रस्ता, पुणे येथे आयोजित केले आहे. महारेराने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त डिजिटल मार्केटिंग व वास्तुशास्त्र या विषयांच्या कार्यशाळा प्रशिक्षणात होणार आहेत.

हे लक्षात ठेवा
- प्रतिव्यक्ती शुल्क पाच हजार अधिक जीएसटी.
- ऑफलाइन प्रशिक्षणाचे ठिकाण: एसआयआयएलसी, सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे
- अधिक माहितीसाठी संपर्क : ८९५६३४४४७५, ७३५०००१६०३, ९१३००७०१३२.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com