Wed, Sept 27, 2023

सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ अन्वये कारवाई
सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ अन्वये कारवाई
Published on : 13 April 2023, 2:05 am
पुणे, ता. १३ : चतुःशृंगी परिसरातील सराईत गुन्हेगार रणजित रघुनाथ रामगुडे (वय २०, रा. सुतारवाडी, पाषाण) याच्यावर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कारवाई केली आहे. त्याला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात एका वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. पोलिस आयुक्तांनी एमपीडीए कायद्यान्वये केलेली ही नववी कारवाई आहे.
रामगुडे आणि त्याच्या साथीदारांविरोधात चतुःशृंगी आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीररीत्या हत्यार बाळगणे, दुखापत करणे आणि वाहनांची तोडफोड असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध गेल्या पाच वर्षांत पाच गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती.