दिवंगत खासदार गिरीश बापट 
यांना बीएमसीसीत श्रद्धांजली

दिवंगत खासदार गिरीश बापट यांना बीएमसीसीत श्रद्धांजली

पुणे, ता. १५ : पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वातावरणाशी समरस झालेला आणि लोकांच्या प्रश्न समजावून घेणारा राजकारणी हरपला, अशा शब्दांत मान्यवरांनी दिवंगत खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली.
बापट हे बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे (बीएमसीसी) माजी विद्यार्थी होते. महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघटनेने श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले, बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, प्राचार्य जगदीश लांजेकर, ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ, प्रकाश भोंडे, अरुण निम्हण, बाळासाहेब गांजवे आदी मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या.
अनास्कर म्हणाले, ‘‘राजकारण जगणे काय असते, याची माहिती घेण्यासाठी युवा पिढीने बापट यांचे जीवन चरित्र अभ्यासणे आवश्यक आहे. कार्यकर्ता, मैत्री, समाजकार्य म्हणजे काय याची ओळख बापट यांच्या जीवनातून होते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com