स्वामी समर्थ ट्रस्टतर्फे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

स्वामी समर्थ ट्रस्टतर्फे 
धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

पुणे, ता. १५ ः भवानी पेठेतील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टतर्फे मंगळवार (ता. १८) ते शनिवार (ता. २२) या कालावधीत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी व मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. या काळात श्री स्वामी समर्थ यांच्या मूळ चर्म पादुका दर्शनासाठी मंदिरामध्ये ठेवण्यात येणार आहेत.

ट्रस्टचे अध्यक्ष वीरेंद्र किराड यांनी ही माहिती दिली. सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‍घाटन मंगळवारी (ता. १८) सायंकाळी ६ वाजता काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील नृत्यनाटिका, ‘जुनून’ हा फिल्मी कव्वाली, मुजरे व सुफी संगीताचा कार्यक्रम, ‘प्यार का मौसम’ हा हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम, ‘हौस माझी पुरवा’ हे नाटक आणि ‘कल्चर्स ऑफ इंडिया’ देशातील विविध राज्यांची संस्कृती दाखवणारा नृत्य व सांगीतिक आविष्कार, असे विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. या महोत्सवात शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच मान्यवरांचा सत्कारही होणार आहे. शनिवारी (ता. २२) अक्षयतृतीयेनिमित्त पालखी नगरप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. भाविकांनी उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com