जीव मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

जीव मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

पुणे, ता. १५ : अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तक्रार मागे घेण्यासाठी तरुणाने अल्पवयीन मुलगी व तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात २० वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेच्या अल्पवयीन मुलीला संशयित आरोपीने फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केले होते. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात बलात्कार, अपहरण, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉस्को) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यात अटक होऊन त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. तेथून जामीन मिळाल्यानंतर तो बाहेर आला होता. त्यानंतर त्याने बुधवारी (ता. १२) अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन दोघींना तक्रार मागे घ्या, अन्यथा दोघींना जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली होती. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com