अवतीभवती

अवतीभवती

‘गुरुनानक’ फाउंडेशनला सोनोग्राफी, स्ट्रेस टेस्ट मशिन भेट
पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्यातर्फे सीएसआर अंतर्गत गुरुनानक मेडिकल फाउंडेशनला डिजिटल सोनोग्राफी मशिन आणि स्ट्रेस टेस्ट मशिनची देणगी देण्यात आली. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंग लालपुरा यांच्या हस्ते या दोन्ही मशिन पुणे कॅम्पातील गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल वाबी, उपाध्यक्ष बी. आर. मेहता, मुकुल माधव फाउंडेशनचे सचिन कुलकर्णी, इंदिरा बजाज, गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे चरणजीत सिंह सहानी, संतसिंग मोखा, सुरिंदर धुपाल, राजपाल सिंह मारवाह आदी उपस्थित होते. गुरुनानक मेडिकल फाउंडेशनच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्रात समाजातील रुग्णांना अल्पदरात सुविधा पुरविण्यात येते.

अल्पसंख्यांक आयोगाच्या सल्लागारपदी दारूवाला यांची नियुक्ती
पुणे ः भाजपचे राज्य प्रवक्ते अली दारूवाला यांची राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांच्या हस्ते एका कार्यक्रमात दारूवाला यांची नियुक्ती झाल्याचे पत्र देण्यात आले. या प्रसंगी सॉलोमन सोफर, डॅनियल पेणकर, चरणजितसिंह साहनी, मौलाना झैदी हे अल्पसंख्यांक समुदायाचे प्रतिनिधी, मिलेट ॲण्ड वॉटर वूमन ऑफ इंडिया शर्मिला ओसवाल, भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, नितीन सोनटक्के, अजय खेडेकर, दीपक नागपुरे उपस्थित होते.

समरसता हा प्रत्यक्ष अनुभूतीचा विषय : इदाते
पुणे : ‘‘समरसता हा केवळ पांडित्याचा किंवा प्रबोधनापुरता मर्यादित विषय नसून समरसता हे जीवनमूल्य आहे; तो प्रत्यक्ष अनुभूतीचा विषय आहे. समरसतेचा विषय सामाजिक विषय सूचीवर प्राधान्याने आणून, समाज बांधणी केली पाहिजे,’’ असे मत राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याणकारी बोर्डाचे अध्यक्ष पद्मश्री भिकूजी ऊर्फ दादा इदाते यांनी व्यक्त केले. आणीबाणी विरोधात १९७५ मध्ये लोकशाहीच्या रक्षणासाठी कारागृहात बंदिवासात असलेल्या मिसाबंदी व सत्याग्रहींची लोकतंत्र सेनानी संघाची विभागीय बैठक पुण्यात पार पडली. प्रांत प्रवक्ता अनिल भदे, केंद्रीय कार्यकारिणी समिती सहसचिव अनुपमा लिमये, पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख मुरलीधर घळसासी आणि पुणे, मुंबईसह कोकण विभागातील लोकतंत्र सेनानी संघाचे ४० प्रतिनिधी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com