अक्कलकोट स्वामी समर्थ महोत्सव उत्साहात साजरा

अक्कलकोट स्वामी समर्थ महोत्सव उत्साहात साजरा

पुणे, ता. १८ : अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टतर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‍घाटन मंगळवारी उत्साहात झाले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. अक्कलकोट स्वामी समर्थांची पुण्यतिथी आणि स्वामी समर्थ मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त ट्रस्टने हा महोत्सव आयोजित केला होता. या वेळी पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, अंकुश काकडे, आयोजक वीरेंद्र किराड उपस्थित होते. या वेळी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर, डॉ. सत्यशील नाईक, अपर पोलिस अधीक्षक देविदास घेवारे यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान स्मिता सोमण, रसिक गुमास्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नृत्यनाटिका सादर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com