गीता फाउंडेशनतर्फे सामूहिक विष्णुसहस्रनाम पठण

गीता फाउंडेशनतर्फे सामूहिक विष्णुसहस्रनाम पठण

पुणे, ता. २१ ः गीता फाउंडेशन, मिरज या संस्थेचे संस्थापक दिलीप आपटे, स्वामी चैतन्यानंद यांनी १ जानेवारी २०१९ या दिवशी १२ कोटी विष्णुसहस्रनाम स्तोत्र पठणाचा संकल्प सोडला होता. याअंतर्गत येत्या शुक्रवारी (ता. २८) दुपारी ३ ते ७ या वेळेत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्र येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात आपटे यांचे भागवतावरील प्रवचन व इतर मार्गदर्शन आणि सामूहिक विष्णुसहस्रनाम पठण होणार आहे. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य आहे. विष्णुसहस्रनाम स्तोत्र पठणाच्या संकल्पाला आता चार वर्षे होऊन गेली आहेत. यातील १२ कोटी संकल्पापैकी सुमारे ७ कोटी आवर्तने झाली आहेत. आजवर सुमारे २५ हजार साधक या आगळ्यावेगळ्या यज्ञात आपली समिधा नियमितपणे अर्पण करीत आहेत. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी हा संकल्प आहे. त्यामुळे अधिकाधिक साधकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com