Thur, October 5, 2023

''पीएमपी''च्या रक्तदान
शिबिरात १९०३ जणांचा सहभाग
''पीएमपी''च्या रक्तदान शिबिरात १९०३ जणांचा सहभाग
Published on : 21 April 2023, 4:36 am
पुणे, ता. २१ : राज्यात उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा जाणवतो. हे लक्षात घेऊन पीएमपीच्यावतीने १६ व्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी (ता. २१) रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात १९०३ जणांनी सहभाग नोंदविला. पीएमपीने यासाठी १६ ठिकाणी शिबिर आयोजित केले होते.
रक्तदानाचे हे दुसरे वर्ष होते. शुक्रवारी झालेल्या शिबिरात १९०३ रक्दात्यानी सहभाग नोंदविला. रक्त संकलनाची जबाबदारी ३२ रक्तपेढयांवर सोपवली होती. या रक्तदान शिबिरात पीएमपीएमएलचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळी यांनी सहभाग नोंदवला.