Sun, October 1, 2023

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम
Published on : 23 April 2023, 2:37 am
पुणे, ता. २२ ः श्री स्वामी समर्थ ग्रुप ट्रस्टच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. त्या अनुषंगाने पार पडलेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमात हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये श्री शंकर महाराज व श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन व महाप्रसादाचे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योगदान दिले.