
राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटनेतर्फे रमझान ईद साजरी
पुणे, ता. २२ : रमझान ईदनिमित्त गोळीबार मैदान परिसरातील इदगाह मैदान येथे सकाळपासूनच रंगीबेरंगी कपडे घालून सुमारे चाळीस हजार मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ईदच्या नमाजचे पठाण केले आणि देशाच्या भविष्यासाठी प्रार्थना केली. राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना, ईदगा ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ईद मिलन’ कार्याक्रमात सर्व मुस्लिम बांधवांचे गुलाब आणि शिरखुर्मा देत रमझान ईद मोठ्या उत्साहाने साजरी करणात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार संजय काकडे, प्रमुख पाहुणे पोलिस आयुक्त रितेशकुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, आमदार रवींद्र धंगेकर, सुनील कांबळे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी आदी उपस्थित होते. या प्रसंगी दिवंगत खासदार गिरीश बापट आणि आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ताहेर कासी आणि ईदगाह चे अध्यक्ष जैनतुल काझी यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुश्ताक पटेल यांनी तर आभार प्रदर्शन जैनुल काझी यांनी केले.