रिक्षा पंचायतचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

रिक्षा पंचायतचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुणे, ता. २३ : रिक्षा पंचायतचा २९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यंदा प्रथमच पुणे व पिंपरी चिंचवडच्या १३ मतदारसंघात सुमारे २५ मध्यवर्ती रिक्षा थांब्यावर साजरा करण्यात आला. यावेळी सुमारे २०० ज्येष्ठ रिक्षा चालकांचा सत्कार केला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी संस्थेच्या भवानी पेठ कार्यालयात उपस्थित राहून शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, संस्थेचे सरचिटणीस नितीन पवार उपस्थित होते.
याप्रसंगी रिक्षा चालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
डॉ. आढाव म्हणाले, ‘‘रिक्षा हे गरिबांचे वाहन आहे. प्रवाशांच्या दारा जवळ जाणारे हे एकमेव वाहन आहे. मात्र आता वाहतुकीत नवा बदल होत आहे. पुण्यात मेट्रो सुरु झाली, तिचा विस्तार होत आहे. नवी वाहने उपलब्ध होत आहे. तेव्हा रिक्षा चालकांनी लोकांचे आवडते बनले पाहिजे’’
डॉ. शिंदे म्हणाले, ‘‘रिक्षा चालकाच्या समस्या सोडविण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. पासिंगसाठी रिक्षा चालकांना दिवे घाट येथे जावे लागत होते. मात्र २५० मीटरचा ट्रॅक सुरु झाला आणि हा प्रश्न मिटला.’’ नितीन पवार यांनी प्रास्ताविक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com