
संत निरंकारी सत्संगात बाराशे जणांचे रक्तदान
पुणे, ता. २४ ः ‘‘रक्तदान हे केवळ एक सामाजिक कार्य नसून मानवीयतेचा असा एक दिव्य गुण आहे, जो योगदानाची भावना दर्शवितो आणि त्यातून रक्ताची नाती निर्माण होतात’’, असे प्रतिपादन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी ‘मानव एकता दिवस’ कार्यक्रमाच्या निमित्ताने केले.
या अभियानात गंगाधामजवळील संत निरंकारी सत्संग भवन येथे १ हजार १८० युनिट, तर देशात ५० हजारहून अधिक युनिट रक्त संकलित करण्यात आले. ‘मानव एकता दिवस’ या दिनी देशामध्ये अनेक ठिकाणी सत्संग आणि रक्तदान शिबिरे होतात. रक्तदान शिबिराला प्राप्तीकर विभागाचे अधिकारी सुनील शिंदे, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरामध्ये वायसीएम रुग्णालय रक्तपेढी यांनी ५५० युनिट, ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी ६३० युनिट रक्त संकलन केले.