मानसिक आरोग्यासंबंधी मोफत हेल्पलाइन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानसिक आरोग्यासंबंधी मोफत हेल्पलाइन
मानसिक आरोग्यासंबंधी मोफत हेल्पलाइन

मानसिक आरोग्यासंबंधी मोफत हेल्पलाइन

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि मानसिक आरोग्यसेवा गरजूंना सहज उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुक्ता चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे मोफत ‘मेंटल हेल्थ हेल्पलाइन’ सुरू करत असल्याचे ट्रस्टच्या सेक्रेटरी डॉ. रूपा अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. व्यवसाय, नातेसंबंध आणि मनातील कोणत्याही दैनंदिन समस्यांबाबत दर्जेदार, निनावी आणि पूर्वग्रहविरहित मानसिक आरोग्य समुपदेशन तज्ज्ञांमार्फत या हेल्पलाइनद्वारे (७८८७८ ८९८८२) पुरवले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भविष्यात मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार असून चार पैकी एका व्यक्तीला या प्रश्नाला सामोरे जावे लागणार आहे. समाजातील असुरक्षित घटक, किशोरवयीन मुले, दीर्घकाळ आजाराने ग्रस्त व्यक्ती, पीडित महिला, एकल पालक, वेश्याव्यवसाय आणि व्यासनाधीनतेशी संघर्ष करणाऱ्या सर्वांसाठी ही सेवा उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.