एसआयआयएलसी

एसआयआयएलसी

सकाळ ता. २७ एप्रिल, गुरुवार प्रसिद्धीसाठी विशेष बातमी
सर्व आवृत्त्यांसाठी SIILC च्या या इमेलसोबत जोडलेल्या लोगोसह वापरावी

रिअल इस्टेट एजंटसाठी उद्या विनामूल्य वेबिनार
महारेराने बंधनकारक केलेल्या प्रशिक्षण, परीक्षा व प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन

पुणे, ता. २६ : बांधकाम व्यवसाय तसेच जमीन खरेदी-विक्री संदर्भातील व्यवहारांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या एजंटकडे कायदेशीर ज्ञान असावे म्हणून महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या वतीने एजंट प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रम बंधनकारक करण्यात आला आहे.

सकाळ माध्यम समूहाची शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’ ही महारेराची अधिकृत प्रशिक्षण संस्था आहे. फेब्रुवारीपासून आजपर्यंत संस्थेने सहाशेहून अधिक एजंटचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाधिक एजंटपर्यंत महारेराच्या या नव्या निर्देशांची माहिती पोचावी, प्रशिक्षणासाठीचा अभ्यासक्रम काय आहे व महारेरा लवकरच घेत असणाऱ्या परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे, याबाबत माहिती देणाऱ्या विनामूल्य वेबिनारचे आयोजन शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे.

वेबिनारमध्ये महारेराने घेतलेल्या या निर्णयाचे महत्त्व, या निर्णयामुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे नव्याने तयार होणारे संघटित स्वरूप कसे असेल, यामुळे निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या संधी कोणत्या असतील याबद्दल सविस्तर माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञ देणार आहेत. तसेच महारेरा लवकरच घेत असणारी परीक्षा कधी होणार, परीक्षा फॉर्म कसा भरायचा याबाबतही माहिती दिली जाणार आहे. वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क: ८९५६३४४४७५, ७३५०००१६०३, ९१३००७०१३२.
क्यूआर कोड:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com