लोणावळ्यात आजपासून
शिक्षणाधिकारी कार्यशाळा

लोणावळ्यात आजपासून शिक्षणाधिकारी कार्यशाळा

पुणे, ता. २७ : शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा शुक्रवारी (ता. २८) आणि शनिवारी (ता. २९) दरम्यान लोणावळा येथील द ॲम्बी व्हॅली सिटी येथे होणार आहे.
स्टार व समग्र शिक्षा प्रकल्प, निपुण भारत आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणी संदर्भात ही कार्यशाळा असणार आहे. यात शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
राज्य सरकारने यंदाचे वर्ष गुणवत्ता वृद्धी वर्ष म्हणून घोषित केले आहे. तसेच केंद्र सरकारने निपुण भारत अभियान आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचित केले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाचे प्रशासकीय आणि शैक्षणिक नियोजन, नियंत्रण करणे यासाठी ही राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केली आहे. ‘शैक्षणिक धोरणाचा प्रवास आणि राज्याची भविष्यवेधी’, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आढावा’, ‘साक्षरतेचे अध्यापनाचे शास्त्र’, ‘निपुण भारत’, ‘नवभारत साक्षरता अभियान’, ‘शाळा समूह’, ‘आदर्श शाळांची सद्यःस्थिती, ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भूमिका’ अशा विषयांवर सादरीकरण होणार आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com