एक थाळी पडली 
दोन लाख रुपयांना

एक थाळी पडली दोन लाख रुपयांना

पुणे, ता. २७ : एखाद्या वस्तूवर एक मोफत म्हटले की ते आमिष किती महागात पडू शकते? तर पुण्यातील एका महिलेला जेवणाची एक थाळी पडलीय चक्क एक लाख ९९ हजार रुपयांना. सायबर चोरट्यांनी एका महिलेला फेसबुकवर ‘एका थाळीवर एक थाळी फ्री’ची ऑफर देत एक लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी एका महिलेने (वय ३८, रा. शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार खडक पोलिस ठाण्यात प्रकाश कुमार (रा. गार्डन बाजार, फुलबडी, जि. मुन्नर, केरळ) आणि त्याच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २२ जुलै २०२२ रोजी घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आईच्या फेसबुकवर पुण्यातील एका नामांकित हॉटेलची ‘एका थाळीवर एक थाळी फ्री’ अशी जाहिरात दिली होती. फिर्यादी यांच्या वडिलांनी त्यावरील मोबाईल क्रमांकावर फोन केला. त्यावेळी आरोपी प्रकाश कुमार याने त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून एक लाख ९९ हजार रुपये काढून घेतले. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता यादव करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com