Wed, October 4, 2023

वीज गाऱ्हाणे मंचच्या अध्यक्षपदी फडके
वीज गाऱ्हाणे मंचच्या अध्यक्षपदी फडके
Published on : 28 April 2023, 5:34 am
पुणे, ता. २८ : महावितरणच्या पुणे परिमंडळ अंतर्गत वीजग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचच्या (सीजीआरएफ) अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सुहास फडके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. फडके हे बारामती परिमंडळ अंतर्गत वीजग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे रिक्त असलेल्या पुणे येथील अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. फडके हे राज्य सरकारच्या विद्युत विभागात विद्युत निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.