मूट कोर्ट कॉम्पिटिशनमध्ये भारती विद्यापीठाचे यश

मूट कोर्ट कॉम्पिटिशनमध्ये भारती विद्यापीठाचे यश

पुणे : हाँगकाँग आणि व्हिएन्ना येथील विल्यम सी. व्हीस इंटरनॅशनल कमर्शिअल आर्बिट्रेशन मूट कोर्ट कॉम्पिटिशनमध्ये भारती अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजच्या विद्यार्थी संघाने यश मिळवले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरीचे लेखी प्रमाणपत्र मिळवले. व्हिएन्ना येथील मूट कोर्ट कॉम्पिटिशनमध्ये सहभागी ४०० संघांपैकी पहिल्या ७० संघांमध्ये स्थान मिळवले.
भारती विद्यापीठ विधी विद्याशाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. उज्वला बेंडाळे, सहायक प्राध्यापक शिवांगी सिन्हा आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हॉंगकॉंग येथील स्पर्धेत आर्यन प्रताप, भाव्या नारायण, कुशाग्र शर्मा, सेफाली झा, सृष्टी चौधरी, रिद्धीमा सिन्हा, उत्कर्ष, नमन श्रीवास्तव यांनी तर व्हिएन्ना येथील स्पर्धेत अरिजित संन्याल, आशी जैन, कृतज्ञ अग्रवाल, उष्मा जैन, अनिशा आर्य, संभावी शिवानी यांनी भाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com