पुणे आंतरराष्ट्रीय व्यंग्यचित्र महोत्सवाचे शुक्रवारी आयोजन राज ठाकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे आंतरराष्ट्रीय व्यंग्यचित्र 
महोत्सवाचे शुक्रवारी आयोजन

राज ठाकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन
पुणे आंतरराष्ट्रीय व्यंग्यचित्र महोत्सवाचे शुक्रवारी आयोजन राज ठाकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन

पुणे आंतरराष्ट्रीय व्यंग्यचित्र महोत्सवाचे शुक्रवारी आयोजन राज ठाकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन

sakal_logo
By

पुणे, ता. २९ ः पुणे आंतरराष्ट्रीय व्यंग्यचित्र महोत्सवाचे शुक्रवारी (ता.५) आयोजन करण्यात येणार आहे. युवा संवाद सामाजिक संस्थेच्यावतीने व कार्टूनिस्ट्स् कंबाईन यांच्या सहकार्याने पुण्यात प्रथमच हा महोत्सव पार पडणार आहे. महोत्सवात जगभरातील २५४ तर भारतातील १०० व्यंग्यचित्रकारांनी सहभाग घेतला असून, विविध रंग व रेषांचे आविष्कार चोखंदळ पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत.

नवी पेठेतील श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत युवा संवादचे अध्यक्ष धनराज गरड यांनी ही माहिती दिली. यावेळी व्यंग्यचित्रकार चारुहास पंडित, विश्वास सूर्यवंशी, योगेंद्र भगत आदी उपस्थित होते. महोत्सवाचे उद्‌घाटन शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता बालगंधर्व कलादालन पुणे येथे मनसेचे अध्यक्ष व व्यंग्यचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. हा महोत्सव तीन दिवस चालणार असून तीन दिवसांमध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवादरम्यान परिसंवाद, व्यंग्यचित्रांची प्रात्यक्षिके तसेच नवोदित व दिग्गज व्यंग्यचित्रकारांचा कलाविष्कार अनुभवता येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील महोत्सवास भेट देणार आहेत. परिसंवादामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार व कवी रामदास फुटाणे सहभागी होणार आहेत. तसेच रविवार (ता. ७) रोजी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते व्यंग्यचित्रकारांना सन्मानित करण्यात येईल, असेही गरड यांनी सांगितले.