Sat, Sept 23, 2023

तरुणास मारहाण करून ऐवज लुटला
तरुणास मारहाण करून ऐवज लुटला
Published on : 29 April 2023, 4:41 am
पुणे : लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणास तिघांनी जबर मारहाण करून त्याच्याकडील सोनसाखळी, मोबाईल, रोख रक्कम असा २७ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून नेला. ही घटना आंबेगाव पठार येथे शुक्रवारी रात्री सव्वादोन वाजता घडली. या प्रकरणी सोमेश हनुमंत अब्दागिरे (वय २५, रा. आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुणाचा टुरिस्टचा व्यवसाय आहे. शुक्रवारी रात्री उशिरा काम संपल्यानंतर ते त्यांच्या कारमधून घरी निघाले होते. दरम्यान, आंबेगाव पठार येथे ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्याकडील किमती ऐवज जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.