वृद्धाश्रमांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला : डॉ. विनोद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृद्धाश्रमांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला : डॉ. विनोद
वृद्धाश्रमांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला : डॉ. विनोद

वृद्धाश्रमांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला : डॉ. विनोद

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : ‘‘आई-वडीलांना वृद्धाश्रमात ठेवणे म्हणजे टाकून देणे हा जुना अर्थ झाला. नवीन काळात वृद्धाश्रमांची सामाजिक भूमिका बदलली आहे. उतार वयातील आई-वडिलांची शास्त्रीय पद्धतीने काळजी घ्यावी आणि त्यांना चांगली पायाभूत सुविधा मिळावी हा वृद्धाश्रमांचा आधुनिक दृष्टिकोन आहे,’’ असे योगतज्ज्ञ डॉ. संप्रसाद विनोद यांनी सांगितले.
कोथरूड येथील पलाश रिकव्हरी अँण्ड रिहॅब सेंटरच्या पिंपरी चिंचवड येथील किवळे केंद्राचे उद्‍घाटन विनोद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी डॉ. शिल्पा वटे, डॉ. मेधा संगवीकर उपस्थित होत्या.
डॉ. विनोद म्हणाले, ‘‘पुण्यासारख्या शहरात घरांच्या किमती वाढत आहे. घर घेतल्यानंतर त्याचे बँकांचे हप्ते भरणे आणि कुटुंबाचा चरितार्थ चालविणे या दोन्ही गोष्टींसाठी एकाच व्यक्तीचे अर्थार्जन पुरेसे पडत नाही. त्यामुळे घरातील पती-पत्नींना कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते. मुले शाळेत जातात. दिवसभर घरात आई-वडील एकटे काय करणार, हा प्रश्न कामावर असणाऱ्या मुलांना भेडसावत असतो. आई-वडीलांना वृद्धाश्रमात ठेवणे मुलांनाही आवडत नाही. पण, त्यांना चांगली सेवा-सुविधा मिळावी, या उद्देशाने मुले वृद्धाश्रमांकडे बघतात. बदलत्या काळात ज्येष्ठ नागरिकांनीही बदललेला दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे.’’