शनिवारवाडा कृती समितीतर्फे आरती

शनिवारवाडा कृती समितीतर्फे आरती

पुणे, ता. ३० : शनिवारवाडा परिसरातील शंभर मीटरच्या भागात केंद्र सरकारच्या पुरातत्त्व खात्याने बंदी घातली आहे. पुरातत्त्व कायद्यातील जाचक अटी रद्द करून बांधकामाची परवानगी मिळावी याकरिता शनिवारवाडा कृती समितीतर्फे रविवारी प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली. आमदार रवी धंगेकर यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली. या वेळी कृती समितीचे पांडुरंग करपे, झुंबरलाल खडके, गणेश नलावडे, जितेंद्र निजामपूरकर, स्वप्नील थोरवे, राजेंद्र खराडे, मुरलीधर देशपांडे आणि मयुरेश पवार उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना धंगेकर म्हणाले, ‘‘शनिवारवाडा भोवतालच्या तीनशे मीटरच्या परिसरातील मिळकतींना बांधकामाची परवानगी मिळावी, यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, असे केंद्र सरकारला आवाहन करण्यात आले. प्रभू श्रीराम यांची आरती ही फक्त सुरुवात असून इथूनपुढे कायद्यात बदल व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com