
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा आंतरमहाविद्यालयीन महोत्सव उत्साहात
पुणे, ता. २ ः आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) वतीने नुकतेच ‘पेस’, ‘अमेथिस्ट’ आणि ‘सोल्यूशन्स’ या आंतरमहाविद्यालयीन क्रिडा-सांस्कृतिक व तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात राज्यभरातून विविध महाविद्यालयातील संघांनी सहभाग घेतला होता.
या महोत्सवादरम्यान एआयटीचे संचालक ब्रिगेडियर अभय भट (निवृत्त), सहसंचालक कर्नल मनोज कुमार प्रसाद (निवृत्त), प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या महोत्सवादरम्यान मनमोहक नृत्यासह कलागुणांचे सादरीकरण, जिंकण्याच्या वृत्तीने केलेला खेळ आणि इनोव्हेशन, तंत्रज्ञानाच्या आविष्कारातून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेचे, उत्साहाचे दर्शन घडवले. ‘सोल्यूशन्स २०२३’मध्ये आयआयटी, एनआयटी या इन्स्टिट्यूट्ससह भारतातील विविध महाविद्यालयांतून पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कोडिंग, गेमिंग, रोबोटिक्स अशा ऑनलाइन व ऑफलाईन स्वरूपात विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
कोरोनानंतर यंदा ‘अमेथिस्ट’ हा सांस्कृतिक महोत्सव एआयटीमध्ये आयोजित केला होता. त्यामध्ये नृत्य, गायन, बॅटल ऑफ बाँड्स, जॅम, वादविवाद, नाट्य, प्रश्नमंजूषा असा विविध स्पर्धा झाल्या. ‘हानामी’ या जापनीज परंपरेवर आधारित हा महोत्सव होता.