चुकवू नये असे काही

चुकवू नये असे काही

१) ‘अकॉर्डियन ऑन व्हील’
‘अकॉर्डियन ऑन व्हील’ या कार्यक्रमाद्वारे पुणे मेट्रोमध्ये अनोख्या पद्धतीने जागतिक अकॉर्डियन दिवस साजरा करण्यात येणार आहे. पुणे मेट्रोच्या ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला असून चार नामवंत अकॉर्डियन कलाकार यावेळी जुनी हिंदी गीते उपस्थितांसमोर सादर करतील. वनाज मेट्रो स्टेशनमधून मेट्रो निघाल्यानंतर हा कार्यक्रम सुरु होईल. वनाज ते गरवारे मेट्रो स्टेशन आणि पुन्हा गरवारे ते वनाज स्टेशन या प्रवासात कार्यक्रम होणार आहे.
कधी ः शनिवार (ता. ६)
केव्हा ः सकाळी ९.३० वाजता
कुठे ः वनाज मेट्रो स्थानक, कोथरूड

२) ‘स्मितांजली’ ः
व्हायोलिन अकादमीच्या संस्थापक-सदस्य स्मिता उपाध्ये यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘स्मितांजली’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात अकादमीचे सर्व कलाकार‌ व्हायोलिनवर सिनेमातील जुनी बहारदार गाणी सादर करून त्यांना भावांजली अर्पण करणार आहेत.
कधी ः शनिवार (ता. ६) व रविवार (ता. ७)
केव्हा ः सायंकाळी ५ वाजता
कुठे ः शनिवारी - पंडित फार्म्स, कर्वे नगर, पुणे आणि रविवारी - व्हायोलिन अकादमी, रत्नदीप बिल्डिंग, सहकारनगर

३) ‘परंपरा’
गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे ‘परंपरा’ ही मालिका सुरू करण्यात येत असून मालिकेतील पहिले पुष्प येत्या रविवारी गुंफले जाणार आहे. यावेळी भरतनाट्यम्‌‍ नृत्यगुरू, नृत्यदिग्दर्शिका स्मिता महाजन आणि त्यांच्या शिष्या भरतनाट्यम्‌‍ संगीताचार्य अलका लाजमी नृत्याविष्कार सादर करणार आहेत.
कधी ः रविवारी (ता. ७)
केव्हा ः सायंकाळी ५ वाजता
कुठे ः ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, प्लॉट नं. १७, वेदभवन मागे, कोथरूड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com