‘दलित साहित्याने मराठी साहित्‍य समृद्ध केले’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘दलित साहित्याने मराठी साहित्‍य समृद्ध केले’
‘दलित साहित्याने मराठी साहित्‍य समृद्ध केले’

‘दलित साहित्याने मराठी साहित्‍य समृद्ध केले’

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः वेदना, विद्रोह आणि नकार याच्या संयोगातून दलित साहित्याची निर्मिती झाली. आत्मस्तुतीपर केल्या जाणाऱ्या चरित्रात्मक लेखनापेक्षा ही वेगळी वाट होती. या संयोगातून जन्माला आलेल्या दलित साहित्याने मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी बुधवारी (ता. ३) व्यक्त केले.

प्रा. रतनलाल सोनाग्रा लिखित आणि निहारा प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘सोनचाफा’ या आत्मकथनपर पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे आणि निहारा प्रकाशनच्या डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी आदी उपस्थित होते. कसबे म्हणाले, ‘‘सुरूवातीला चरित्रात्मक आणि आत्मकथनपर लेखनाला साहित्य दर्जा द्यावा, या मताचा मी नव्हतो. कारण त्यात स्वयंस्तुतीवरच अधिक भर आढळून येतो. परंतु, आत्मचरित्रपर लेखनाच्या आवश्यकतेबाबत दया पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर माझे विचार बदलले.’’ प्रा. सोनग्रा म्हणाले, ‘‘आचार्य अत्रे यांचा माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे. अनावधानाने त्यांची शैली माझ्यात परावर्तीत झाली आणि अक्षरापासून लेखनापर्यंत मी त्यांच्या जवळपास पोहोचतो, असे माझ्या सहकाऱ्यांनी आणि मित्रपरिवाराने निदर्शनास आणून दिले.’’