
‘पीएमपी’ची नवी बससेवा सुरू
पुणे, ता. ३ : प्रवाशांच्या मागणीचा विचार करता पीएमपी प्रशासन गुरुवार (ता. ४)पासून दोन नवीन बसमार्ग सुरू करीत आहे. यात मार्ग क्रमांक ९५ - डेक्कन ते शिवाजीनगर आणि मार्ग क्रमांक ९६ - डेक्कन ते पुणे विद्यापीठ या दोन मार्गांचा समावेश आहे.
मार्ग ९५ - डेक्कन-शिवाजीनगर-डेक्कन, मार्गे - डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रस्ता, मनपा भवन, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, वेळ : सकाळी - ०८:००, ०८:४०, ०९:२०, १०:००, १०:४०, ११:२०, दुपारी - ०४:००, ०४:४०, सायंकाळी - ०५:२०, ०६:००, ०६:४०, ०७:२०
मार्ग ९६ - डेक्कन-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-डेक्कन, मार्गे - डेक्कन जिमखाना, भांडारकर रस्ता, शेती महामंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ई-स्क्वेअर, सिमला ऑफिस, डेक्कन जिमखाना, वेळ : सकाळी - ०७:३०, ०८:४०, ०९:५०, ११:००, दुपारी - ०४:००, सायंकाळी - ०५:१०, ०६:२०