Sat, Sept 30, 2023

आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस उत्साहात
आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस उत्साहात
Published on : 5 May 2023, 8:10 am
पुणे, ता. ५ ः जगभरातील अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ तसेच, सर्व स्तरांमध्ये अग्निशमन दलाच्या कामगिरीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दक्षिण मुख्यालयाच्या नेतृत्वाखाली कॅम्प येथे गुरुवारी ‘आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन’ साजरा करण्यात आला. यात सैन्यदलासह पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांनी सहभाग घेत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. या संयुक्त प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सैन्यदल आणि महापालिका यांच्यातील समन्वय वाढविणे हा होता.