Wed, Sept 27, 2023

भगिनी निवेदिता
बँकेतर्फे प्रदर्शन
भगिनी निवेदिता बँकेतर्फे प्रदर्शन
Published on : 4 May 2023, 2:21 am
पुणे, ता. ४ ः भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बँकेच्या ग्राहकांनी तयार केलेल्या विविध उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन शुक्रवारी (ता. ५) प्रभात रस्त्यावरील कोहिनूर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी १०. ३० ते रात्री ८. ३० वाजेपर्यंत खुले आहे. वस्तूंची या प्रदर्शनात विक्रीही होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन बॅंकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजर पल्लवी तेंडूलकर यांनी केले आहे.