शनिवार, ता. ६

शनिवार, ता. ६

शनिवार, ता. ६ चे स्थानिक

सकाळी
- प्रदर्शन ः ‘श्री कैलासाचे अंतरंग’ संत-महात्म्यांच्या निसर्गनिर्मित प्रतिमांचे प्रदर्शन ः आयोजक - आदर्श विद्यार्थी प्रकाशन ः स्थळ - यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड ः १०.०० पासून

दुपारी
- व्याख्यान ः विषय - भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये ः वक्ते - डॉ. अविनाश कोल्हे ः आयोजक - युवक क्रांती दल, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ः स्थळ - गांधी भवन, कोथरूड ः २.००
- व्याख्यान ः वसंत व्याख्यानमाला ः दत्तो वामन पोतदार स्मृती व्याख्यान ः विषय - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व ः वक्ते - मोहन शेटे ः स्थळ - लोकमान्य सभागृह, केसरीवाडा, नारायण पेठ ः ४.००

सायंकाळी
- पुरस्कार ः प्रशांत दामले (ब्राह्मणभूषण), डॉ. सागर देशपांडे (इंदुमती-वसंत करिअरभूषण), मानसी बडवे (डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनकार) व देशस्थ ऋवेदी शिक्षणोत्तेजक संस्था (भगवान परशुराम ब्राह्मण संस्था) यांना पुरस्काराचे वितरण व प्रशांत दामले यांची मुलाखत ः हस्ते - डॉ. गजानन एकबोटे, श्रीकृष्ण चितळे ः संवादक - राजेश दामले ः स्थळ - मॉडर्न कॉलेज ऑडिटोरियम, शिवाजीनगर ः ५.३०
- व्याख्यान ः कै. रागिणी पुंडलिक स्मृती व्याख्यान ः विषय - गीतांजली श्री आणि त्यांची बुकर पारितोषिक विजेती ‘रेत समाधि’ ही कादंबरी ः वक्ते - विनय हर्डीकर ः स्थळ - महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभागृह, टिळक रस्ता, सदाशिव पेठ ः ५.३०
- वादन ः ‘अ‍ॅन इव्हिनिंग विथ अ‍ॅकॉर्डियन’ अ‍ॅकॉर्डियनवादनाचा कार्यक्रम ः सहभाग - अमित वैद्य, गजानन नवाथे, रवी बेन्ने, सागर साठे ः स्थळ - एमईएस बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड ः ५.३०
- पुरस्कार ः ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना ‘समाजशिक्षक’ व वैशाली ढवळे यांना ‘अनुकरणीय उद्योजक’ पुरस्काराचे वितरण ः हस्ते - डॉ. गो. बं. देगलूरकर ः सूत्रसंचालन - सौज्ञा कुलकर्णी ः आयोजक - कै. कृ. ब. ऊर्फ अण्णा तळवलकर ट्रस्ट ः स्थळ - विजय तेंडुलकर नाट्यगृह, राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, शिवदर्शन चौक ः ६.००
- समता उत्सव ः सावित्री-जोतिबा समता उत्सव ः व्याख्यान विषय - स्त्रीप्रश्‍न आणि सामाजिक न्याय - वक्ते - गोपाळ गुरू ः रेऊ कथास्पर्धेचे पारितोषिक वितरण - हस्ते - सुषमा देशपांडे ः रेऊ रथा पुस्तकाचं प्रकाशन - हस्ते - प्रणव सखदेव ः सावित्री-जोतिबा समता सहजीवन सन्मान - सन्मानार्थी - वर्षा ढोके, आमिन सय्यद ः दिशा पिंकी शेख यांच्या कवितांवर आधारित नाटक ‘कुरूप’ ः आयोजक - मिळून साऱ्याजणी ः स्थळ - एस. एम. जोशी मुख्य सभागृह, नवी पेठ ः ६.००
- चर्चासत्र, मार्गदर्शन ः विषय - हृदयरोग व मधुमेह ः मार्गदर्शक - डॉ. सोनाली इनामदार, डॉ. योगेश आसावा ः आयोजक - रोटरी क्लब ऑफ पुणे फॉर्च्युन ः स्थळ - अल्युमिनी हॉल, फर्ग्युसन कॉलेज ः ६.३०
- शब्दोत्सव ः साहित्य प्रचार आणि वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त बाल-कुमार शब्दोत्सव ः ‘ओरिगमीची गोष्ट’ ः सादरकर्ते- मिलिंद केळकर ः आयोजक-अक्षरधारा बुक गॅलरी ः स्थळ- कुसुमाग्रज वाचक कट्टा, अक्षरधारा बुक गॅलरी, बाजीराव रस्ता ः ६.३०.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com