कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : सिंहगड रस्त्यावर खडकवासला धरण चौपाटी परिसरात भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नितीन भाऊसाहेब मुसमाडे (वय ३२, रा. नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर, सहप्रवासी राम गणपत राठोड (वय २७, रा. नऱ्हे) गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मुसमाडे आणि राठोड डोणजे परिसरातून पुण्याकडे निघाले होते. त्या वेळी भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर मोटारचालक डोणजे गावाकडे पसार झाला. रात्र गस्तीवर असणारे पोलिस उपनिरीक्षक डी. पी. शिंदे, महेंद्र चौधरी यांना अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. अपघातात दुचाकीस्वार मुसमाडे याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.