जस्ट डायलला ग्राहकाला 
द्यावे लागणार २८ हजार रुपये

जस्ट डायलला ग्राहकाला द्यावे लागणार २८ हजार रुपये

पुणे, ता. ७ : ग्राहकाला त्रुटीयुक्त सेवा पुरवली म्हणून ‘जस्ट डायल’ला ग्राहकाला नुकसान भरपाईपोटी २५ हजार रुपये व्याजासह द्यावे लागणार आहे. ग्राहक आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्य अनिल जवळेकर आणि शुभांगी दुनाखे यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.

तक्रार अर्जाचा खर्च म्हणून तीन हजार रुपये देण्यात यावेत, असेही आयोगाने आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे एकूण २८ हजार रुपये जस्ट डायलला तक्रारदार ग्राहकाला द्यावे लागणार आहेत. याबाबत गुरुवार पेठ येथील महिलेने ॲड. वाजेद खान (बिडकर) यांच्यामार्फत जस्ट डायल कंपनीचे संचालक आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही.
तक्रारदार यांनी ब्युटी पार्लरच्या जाहिरातीसाठी जस्त डायलशी एक महिन्यासाठी करार केला होता. त्याचा मोबदला म्हणून चार हजार २७५ रुपये दिले होते. ब्युटी पार्लर महिलांसाठी असतानाही त्याचा क्रमांक पुरुषांना दिला. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला. तसेच, त्यानंतर परवानगी न घेता हप्ता कापला. कोरोना काळात कोणतीही जाहिरात न करता मोबदला स्वीकारला. ती रक्कम परत करण्याची मागणी तक्रारदार यांनी केली होती. मात्र, जस्ट डायलने पैसे परत न केल्याने तक्रारदार यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल करून चार लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली केली होती. तक्रारदार हे ग्राहक नाहीत. सेवेच्या सर्व अटी आणि शर्ती मोबाईल क्रमांक आणि ई-मेलवर पाठविल्या आहेत. कराराचा कालावधी एक वर्षाचा असल्याने तक्रारदारांनी ई-मेल करून हप्ता थांबविण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांना ईसीएस स्कीपचे ऑप्शन दिले होते. पण, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तक्रार रद्द करण्याची मागणी जस्ट डायलकडून केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com