महर्षी व्यास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

महर्षी व्यास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

महर्षी व्यास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर
पुणे, ता. ८ : श्री महर्षी व्यास प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘श्री महर्षी व्यास पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. २०२२ या वर्षासाठी कोकमठाण येथील आत्मा मालिक माऊली यांना आणि २०२३ या वर्षासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री प्रतिमा भौमिक यांना जाहीर झाला आहे. तसेच, ‘चित्रपट निर्माते राम डवरी कलागौरव पुरस्कार’ अभिनेत्री पूजा पवार-साळुंखे यांना आणि अभिनेते माधव अभ्यंकर यांना जाहीर झाला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर डवरी यांनी दिली. पुरस्काराचे वितरण बुधवारी (ता. १०) सकाळी ११ वाजता सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते होणार आहे.
----
‘अनुभूती’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
पुणे, ता. ८ : कवयित्री साधना आठल्ये लिखित ‘अनुभूती’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते नुकतेच झाले. याप्रसंगी डॉ. अनिलकुमार कुलकर्णी, वैद्य विवेक हळदवणेकर, कवयित्री आठल्ये उपस्थित होत्या. ‘साधना आठल्ये यांच्या कविता सकारात्मक असून जीवनाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मांडत आहेत’, असे मत लाखे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृदुल ताम्हणकर यांनी केले. डॉ. सुनील ताम्हणकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
----
डॉ. जयराम यांनी सादर केले एकल नृत्य
पुणे, ता. ८ : चेन्नई येथील भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. अपूर्वा जयरामन यांनी ‘अनुभूती’ हा एकल नृत्य सादरीकरणाचा कार्यक्रम नुकताच सादर केला. त्यांनी प्रारंभी कृष्णस्तुती, अंबा कामाक्षी स्वरजतीवर आधारित नृत्यरचना प्रस्तुत केल्या. ‘ठुमक चलत रामचंद्र’ या भजनावर आधारित नृत्यप्रस्तुती लक्षवेधी ठरली. ‘अहल्या उद्धार’ यावर आधारित नृत्य रचनेला उपस्थितांची दाद मिळाली. ‘अवघा रंग एक झाला’ या अभंगावरील नृत्यप्रस्तुतीने सादरीकरणाची सांगता केली. अश्विनी चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी डॉ. परिमल फडके, तमन्ना नायर, अथर्व चौधरी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com