व्यंगचित्र ही भाषेच्या भिंती ओलांडणारी कला : फडणीस

व्यंगचित्र ही भाषेच्या भिंती ओलांडणारी कला : फडणीस

पुणे, ता. ८ : व्यंगचित्र ही भाषेच्या भिंती ओलांडून जाणारी कला आहे. शब्द न वापरता केवळ रेषेच्या माध्यमातून अतिशय समृद्ध कल्पना व्यंगचित्रकारांनी मांडल्या आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी केले.
युवा संवाद सामाजिक संस्थेतर्फे आणि कार्टूनिस्ट्‌‍स्‌‍ कंबाईन यांच्या सहकार्याने बालगंधर्व कलादालनात आयोजित ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा’च्या दुसऱ्या दिवशी फडणीस यांनी प्रदर्शनाला भेट दिली. त्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी कार्टूनिस्ट्‌‍स्‌‍ कंबाईनचे माजी अध्यक्ष चारुहास पंडित, प्रशांत कुलकर्णी, युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे आयोजक धनराज गरड उपस्थित होते.
‘‘चीन, रशिया यासारख्या देशांत व्यंगेतर माध्यम जागृत असेल का, या प्रश्नाचे उत्तर प्रदर्शनातील व्यंगचित्रांतून आज मिळाले. काही व्यंगचित्रकारांनी आपल्या देशातील सामाजिक, राजकीय प्रश्नांचे चित्रण केलं आहे. त्यांना भिडलेले विषय त्यांच्या कलाकृतीत प्रतिबिंबित झालेले आहेत. चित्र आणि चित्रकार या दोघांच्या सान्निध्याची मी वाट पाहत होतो, ती मला मिळाली,’’ अशा शब्दांत फडणीस यांनी समाधान व्यक्त केले.
तरुणांनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग किती चांगल्या पद्धतीने केला आहे, हे या प्रदर्शनातील व्यंगचित्रे पाहिल्यानंतर ठळकपणे जाणवते आहे, असेही फडणीस म्हणाले. प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या हस्ते शि. द. फडणीस यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजय मिस्त्री यांनी केले. यावेळी विवेक मगर, शरयू फरकंडे, मुकीम तांबोळी, विवेक प्रभू केळुस्कर यांचा सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com