सिंहगड रस्ता, कात्रज परिसरात गुरुवारी पाणी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंहगड रस्ता, कात्रज परिसरात गुरुवारी पाणी बंद
सिंहगड रस्ता, कात्रज परिसरात गुरुवारी पाणी बंद

सिंहगड रस्ता, कात्रज परिसरात गुरुवारी पाणी बंद

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : महावितरण कंपनीकडून २२ केव्ही वहन क्षमता असणाऱ्या विद्युत वाहिनीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. ११) वडगाव जलकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या काळात बंद असणार आहे. सायंकाळी पाच नंतर कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
या भागातील पाणी पुरवठा बंद असेल.
हिंगणे, आनंदनगर,वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, येवलेवाडी, सहकारनगर भाग २, आंबेडकरनगर, टिळेकरनगर, दाते बस स्टॉप परिसर.