मोबाईलचे दीड हजार रुपये न दिल्याने एकाचा खून

मोबाईलचे दीड हजार रुपये न दिल्याने एकाचा खून

पुणे, ता. ९ : जुन्या मोबाईल हॅंडसेटचे दीड हजार रुपये न दिल्यामुळे गळ्यावर ब्लेडने वार करून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
अमरजीत जगन्नाथ गोयल (वय ५०, मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. वारजे पुलाजवळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना पाहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी पोलिस नाईक राहुल लहू कदम यांनी फिर्याद दिली. त्यावरून वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राम श्रीमंत वाघमारे (वय २०, रा. वारजे पुलाजवळील पदपथ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे याने अमरजीत गोयल यांना जुना मोबाईल दिला होता. त्या मोबाईलचे दीड हजार रुपये न दिल्यामुळे शनिवारी रात्री अकराच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी वाघमारे याने अमरजीत यांच्या गळ्यावर ब्लेडने वार करून डोक्यात मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे अमरजीत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com