राज्यात उन्हाचा चटका वाढला

राज्यात उन्हाचा चटका वाढला

पुणे, ता. ८ ः वादळी पाऊस राज्यातून निरोप घेत असतानाच आता कमाल तापमानात चांगलीच वाढ होत आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्यावर गेला असून उन्हाचे चटके वाढले आहेत. दरम्यान, ही स्थिती पुढील चार दिवस अशीच कायम राहणार असून मंगळवारी (ता. ९) दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्‍यपी यांनी सांगितले, ‘‘आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून बुधवारपर्यंत (ता. १०) या प्रणालीची तीव्रता वाढत असून त्याचे ‘मोचा’ चक्रीवादळात रुपांतर होण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर ही प्रणाली उत्तरेकडे सरकत बांगलादेश, म्यानमारच्या किनाऱ्याकडे पोहोचण्याचा अंदाज आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यातील आद्रता कमी होत असल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. परिणामी, तापमानातही कमालाची वाढ होत आहे.’’

राज्यात सोमवारी (ता. ८) उच्चांकी तापमानाची नोंद अकोला येथे ४२ अंश सेल्सिअस इतकी झाली. तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे असल्याने उन्हाच्या झळा कायम आहेत. किमान तापमानाचा पारा सुद्धा २४ अंशांच्या पुढे असल्याने उकाडा जाणवत आहे. सध्या ईशान्य राजस्थान व लगतच्या परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. मात्र, बुधवारपासून (ता. १०) राज्यात कोरडे हवामान राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.

येथे पारा ४० अंशांच्या दरम्यान ः
जळगाव ः ४१
अकोला ः ४२
वर्धा ः ४०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com