समलैंगिक विवाह देशात चिंताजनक विषय दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या सर्वेक्षणात ८३.९ टक्के नागरिकांचे मत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समलैंगिक विवाह देशात चिंताजनक विषय

दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या सर्वेक्षणात ८३.९ टक्के नागरिकांचे मत
समलैंगिक विवाह देशात चिंताजनक विषय दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या सर्वेक्षणात ८३.९ टक्के नागरिकांचे मत

समलैंगिक विवाह देशात चिंताजनक विषय दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या सर्वेक्षणात ८३.९ टक्के नागरिकांचे मत

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः ‘‘वैयक्तिक पातळीवर समलैंगिक विवाहांचा स्वीकार करण्याबाबत बहुतांश व्यक्तींचा दृष्टिकोन पारंपरिक आहे. तसेच समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता दिल्यास समाजावर विपरीत परिणाम होण्याची भीती वाटते,’’ असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

समलैंगिक विवाहांबाबत नागरिकांचे काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी आणि या विषयावर समाजात प्रचलित असलेले मत समजून घेण्यासाठी पुण्यातील दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राने हे सर्वेक्षण केले आहे. प्रतिसाद देणाऱ्यांपैकी ८३.९ टक्के लोकांनी समलैंगिक विवाह हा भारतात चिंताजनक विषय असल्याचे म्हटले आहे, तर केवळ १६.१ टक्के लोकांनी हा विषय गंभीर नसल्याचे नमूद केले आहे. समाजातील स्त्रियांचे स्थान आणि संबंधित मुद्द्यांवर केंद्र गेली २० वर्षांपासून संशोधन करत आहे. समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी दाखल केलेल्या १६ याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली.

असे पार पडले सर्वेक्षण
- एकूण भाषा - १३
- प्रतिसाद देणाऱ्यांची विभागणी - १८ ते २५, २६ ते ४०, ४१ ते ६० आणि ६० पेक्षा अधिक असे चार वयोगट
- पुरुष, स्त्री व अन्य या तीन लिंगांमध्ये विभागणी

सर्वेक्षणातून समोर आलेले महत्त्वाचे मुद्दे
- प्रतिसाद देणाऱ्या ७५ टक्के लोकांना समलैंगिक विवाह नैसर्गिक वाटतो
- समलैंगिक विवाहांचा भारतीय समाजावर विपरीत परिणाम होर्इल सांगण्याची संख्या सर्वाधिक
- बहुतांश व्यक्तींनी त्यांच्या किंवा जवळच्या कुटुंबातील समलैंगिक विवाहांना पाठिंबा न देण्याची भूमिका
- देशभरातील सर्व जाती धर्मातून या सर्वेक्षणासाठी प्रतिसाद
- कुमार वयातील मुलामुलींवर होणारे दुष्परिणाम यावर तीव्र चिंता व्यक्त केली गेली आहे
- ज्या बाहेरील देशांत याबाबत दुष्परिणाम दिसू लागले आहेत, त्याकडे आपण लक्ष देत त्याकडे डोळसपणे पाहिले पाहिजे.
- कोणताही निर्णय घेण्यापूर्वी उद्भवू शकणाऱ्या समस्यांवर अध्ययन होणे गरजेचे आहे.