उप डाकपालास सात वर्षे सक्तमजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उप डाकपालास सात वर्षे सक्तमजुरी
उप डाकपालास सात वर्षे सक्तमजुरी

उप डाकपालास सात वर्षे सक्तमजुरी

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : खातेधारकांच्या खात्यातील रकमेचा अपहार केल्याप्रकरणी देहूरोड टपाल कार्यालयामधील तत्कालीन उप डाकपालास न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सीबीआयचे न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा आदेश दिला. रवींद्र सोमनाथ अहिरराव असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या उप डाकपालाचे नाव आहे. अहिरराव हा सीओडी देहूरोड येथील टपाल कार्यालयात कार्यरत होता. या वेळी, त्याने सेंट्रल डेपोतील कर्मचाऱ्यांच्या विविध खात्यांमध्ये एसबी, आरडी, एमआयएस, टीडी आणि सुकन्या समृद्धी खात्यातील रकमेचा अपहार केला. सीओडी देहूरोड येथील टपाल खात्यांमधून अहिरराव याची बदली झाल्यानंतर नवीन पोस्ट मास्तरांना खातेधारक यांच्या खात्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी, टपाल खात्याने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करत अधीक्षक बी. पी. एरंडे यांनी सीबीआयकडे ८७ लाख ९१ हजार ५३८ रुपयांच्या गैरव्यवहाराची तक्रार दाखल केली होती. या खटल्याचे कामकाज सीबीआयतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अभयराज अरीकर यांनी पाहिले. त्यांनी १६ साक्षीदार तपासले.