अच्युत गोडबोले यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अच्युत गोडबोले यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार
अच्युत गोडबोले यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार

अच्युत गोडबोले यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (मसाप) देण्यात येणारा आणि ज्येष्ठ भाषा अभ्यासक व लेखिका डॉ. अंजली सोमण पुरस्कृत ‘मसाप जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांना जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
या पुरस्कारासह ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांना जाहीर झाला असून ११ हजार रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
हे पुरस्कार २७ मे रोजी मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात वर्धापनदिन समारंभात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. ‘मसाप’चे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
संगणकापासून नॅनो टेक्नॉलॉजीपर्यंत, व्यवस्थापनापासून संगीतापर्यंत, अर्थशास्त्रापासून मानसशास्त्रापर्यंत विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणाऱ्या गोडबोले यांनी मराठीतील ज्ञानलक्ष्यी साहित्याचे दालन समृद्ध केले आहे. डॉ. तांबोळी यांनी साहित्य चळवळीतून धार्मिक सुसंवाद, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविधांगी प्रयत्न करून समाजजागरण केले आहे, असे प्रा. जोशी यांनी सांगितले.