हरकतींवर सोमवारपासून सुनावणी
फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषद - लोगो

हरकतींवर सोमवारपासून सुनावणी फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषद - लोगो

पुणे, ता. ९ : फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे पालिकेतून वगळून या दोन गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याच्या अधिसूचनेवर दाखल साडेसहा हजार हरकतींवर पुढील आठवड्यापासून सुनावणी सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून उपजिल्हाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून या अधिकाऱ्यामार्फत सुनावणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका शाखेकडून सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेल्या हरकतींवर नियुक्त अधिकारी सुनावणी घेऊन त्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडे आणि डॉ. देशमुख यांच्याकडून तो शासनाला सुपूर्द करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com