आरटीई प्रवेशाला मुदतवाढ नाही

आरटीई प्रवेशाला मुदतवाढ नाही

पुणे, ता. ९ ः राज्यातील शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेशाची प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. निवड झालेल्या ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांपैकी मंगळवारपर्यंत (ता. ९) केवळ ५४ हजार विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले. अजूनही सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले असून त्यासाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, ही मुदतवाढ शेवटची असेल, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. पुणे जिल्ह्यातही सहा हजार ४२४ प्रवेश रखडले आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन सोडत (लॉटरी) पाच एप्रिल रोजी काढण्यात आली असून, निवड यादीतील बालकांचे प्रवेश आठ मेपर्यंत घ्यायचे होते. मात्र, अजूनही हजारो विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती झाली नसल्यामुळे ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

अर्ज १५ मे पूर्वी निकाली काढा!
प्रलंबित प्रवेशाच्या तक्रारी व अपील अर्जाबाबत सुनावणी घेवून १५ मे पूर्वी निकाली काढण्यात यावीत, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानंतर २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, असेही गोसावी यांनी स्पष्ट केले.

आरटीई प्रवेशाची सद्यस्थिती -
तपशील - राज्य - पुणे जिल्हा
- एकूण राखीव जागा - १ लाख १ हजार ८४६ - १५ हजार ५९६
- एकूण अर्ज - ३ लाख ६४ हजार ४१३ - ७७ हजार ५३१
- प्रवेशासाठी निवड - ९४ हजार ७०० - १५ हजार ५०१
- प्रवेश निश्चित (ता. ९ मेपर्यंत) - ५३ हजार ९३६ - ९ हजार ७७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com