‘एसओईएस’चा वर्धापन दिन उत्साहात

‘एसओईएस’चा वर्धापन दिन उत्साहात

पुणे, ता. १० : सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचा (एसओईएस)चा १६ वा स्थापना दिवस नुकताच किवळे येथील सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एसएसपीयू) सभागृहात पार पडला. या वेळी आयोजित समारंभात एसओईएस संचालित राज्यातील पहिले कौशल्याधारित विद्यापीठ असलेल्या सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा सातवा वर्धापन दिनसुद्धा पार पडला. या प्रसंगी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह प्रमुख पाहुणे होते. सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस. बी. मुजुमदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या वेळी सिंबायोसिस ओपन एज्युकेशनच्या प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार, सोसायटीच्या मॅनेजिंग ट्रस्टी संजीवनी मुजुमदार, प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिऊरकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठातील अशोक स्तंभाचे उद्‍घाटन करून झाली. या वेळी डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘‘बेरोजगारी कमी करण्यास कौशल्यपूर्ण शिक्षणपद्धतीबरोबरच उद्योग आणि विद्यापीठांनी एकत्रित येऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करणे ही काळाची गरज आहे. एसएसपीयू हे कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारे, अशा प्रकारचे पहिलेच विद्यापीठ आहे.’’ प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या, ‘‘सिंबायोसिस नेहमीच नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धतीचा अवलंब करते. एसएसपीयू विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम शिकवते. लवकरच विद्यापीठात नवीन इनक्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात येत आहे.’’ ‘‘सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत राबवण्यात आलेल्या ‘उमेद जागर’ या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला असून, ही अत्यंत आशादायी बाब आहे, असे सिंह म्हणाले.

फोटो ः 42172

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com