‘टिमवि’ला आयएसओ प्रमाणपत्र प्रदान

‘टिमवि’ला आयएसओ प्रमाणपत्र प्रदान

पुणे, ता. १० : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने नुकतेच शनिवारी (ता. ६) शतकोत्तर तिसऱ्या वर्षात पदार्पण केले आहे. आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने ‘टिमवि’ला आयएसओ २१००१:२०१८ प्रमाणपत्र प्रदान केले असून, आजची गरज ओळखून पुरातनविद्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून विद्यापीठाने अनेक व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

या वेळी विद्यापीठाचा कुलगुरू डॉ. गीताली टिळक म्हणाल्या, ‘‘जागतिक बाजारपेठेच्या गरजा लक्षात घेता, नव्या दमाचे तरुण नवनव्या कल्पना घेऊन तयार होतील अशा अभ्यासक्रमाची आखणी विद्यापीठाने केलेली आहे. व्यवस्थापन, वाणिज्य आणि हॉटेल मॅनेजमेंट या विभागांतर्गत अनेक उपयुक्त अभ्यासक्रम राबविले जातात. विद्यापीठाने विश्वविक्रम नोंदविले आहेत. नुकताच विद्यापीठाने १०२ भारतीय गोड पदार्थ बनविण्याचा विश्वविक्रम अवघ्या ४ तासांत पूर्ण केला. भविष्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मिशन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज अशा प्रकारचा अत्याधुनिक लॅबची निर्मिती विद्यापीठ करणार आहे.’’ विद्यापीठाचा वर्धापन दिनानिमित्त मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘फिट इंडिया मूव्हमेंट’ लक्षात घेऊन, विद्यापीठाने या स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांना फिटनेस आणि तंदुरुस्तीचे महत्त्व समजून घेण्यासाठी केल्याचेही डॉ. टिळक यांनी सांगितले. तसेच, लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाचा वारसा विद्यापीठाने समर्थपणे रुजवला आणि वाढविल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com