मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने ‘शताब्दी’ला विलंब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालगाडीचे इंजिन बंद 
पडल्याने ‘शताब्दी’ला विलंब
मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने ‘शताब्दी’ला विलंब

मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने ‘शताब्दी’ला विलंब

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः भिगवण स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने पुणे- सिकंदराबाद- पुणे शताब्दी एक्सप्रेसला दीड तासांचा विलंब झाला. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली होती.

पुणे - सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस ही बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास पुणे स्थानकावरून निघाली. मात्र, भिगवणजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने शताब्दी एक्सप्रेसला सुमारे दोन तास दौंड स्थानकावर थांबून ठेवण्यात आले. दुसरे इंजिन आणल्यानंतर ती मालगाडी पुढे धावली अन् शताब्दीला सोलापूरच्या दिशेने सोडण्यात आले. रोज सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी येणार शताब्दी बुधवारी साडेदहाच्या सुमारास दाखल झाली. गाडीचे वाट पाहत प्रवासी थांबले होते. या गाडीला पुढे सिकंदराबादलादेखील पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे सिकंदराबाद - पुणे शताब्दी एक्सप्रेसलाही उशीर झाला. पुण्याला रात्री ११ वाजून १० मिनिटांनी पोहोचणारी ही गाडी पुण्याला रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी पोहोचली.