लष्करातील जवानांसाठी 
मतदार ओळख मेळावा

लष्करातील जवानांसाठी मतदार ओळख मेळावा

पुणे, ता. ११ : फिल्ड ॲम्युनिशन डेपो, पुणे यांनी निवडणूक आयोग (मावळ) यांच्या सहकार्याने लष्करासाठी दोन दिवसीय ‘मतदार ओळख मेळाव्या’चे आयोजन केले होते. या माध्यमातून लष्करातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांची नवे मतदार म्हणून नोंदणी करणे, हा उद्देश होता. पुणे केंद्रात नुकत्याच बदली झालेल्या व्यक्तींचा समावेश करून त्यांना सेवा मतदार म्हणून मतदान करण्याची आणि लोकशाही प्रक्रियेचा एक भाग बनण्याची संधी उपलब्ध करून देणे यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सेवा मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लघु मतदारयादी पुनर्रचना मोहिमेअंतर्गत हा मेळावा पार पडला. देहूरोडचे स्टेशन कमांडर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी ९७३ व्यक्तींनी नवीन मतदार म्हणून नोंदणी केली. तसेच ४५२ मतदारांना ओळखपत्रे हस्तांतरित करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com